Posts

Her Story | Hon. Collector Aarti Dogra

Image
तीन फूट उंचीची जिल्हाधिकारी :  ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली. आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात.  मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तिचे नाव आहे आरती डोगरा....! जिची उंची फक्त 3 फूट 6 इंच आहे. समाजाचं टोमणे खाऊन आयएएस अधिकारी बनलेल्या त्या 3 फूट मुलीची कहाणी जाणून घ्या. आरती डोगरा आज राजस्थान केडरची आयएएस अधिकारी आहे. आरती जरी शरीराने लहान असू शकते परंतु आज ती देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून उदयास आली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेल्या समाजिक परिवर्तनासाठी त्यांनी अनेक मॉडेल्स सादर केल्या आहेत .  आरती मूळची उत्तराखंडची.. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या देहराडून येथे झाला. आरती 2006 बॅचची आयएएस अधिकारी आहे.